Saturday, November 26, 2011

सौंदर्यवृद्धीसाठी कॉस्मेटिक सर्जरी


कॉस्मेटिक सर्जरी हि प्लास्टिक सर्जरीची एक उपशाखा आहे. सौंदर्य वृद्धी साठी करण्यात येणाऱ्या सर्व ऑपरेशन चा यात अंतर्भाव होतो. यात नाकाचा आकार सुधारणे, जाड ओठ  पातळ करणे वा पातळ ओठांना 'पाऊट' देण्यासाठी फुगीरपणा आणणे, तोंडाच्या आतून ऑपरेशन करून गालावर सुंदरशी खळी पाडणे, अर्धवट मिटलेली पापणी टोसीस सर्जरीने उघडणे,हनुवटीचा आकार प्रमाणात आणणे, हनुवटी खालील 'डबल चिन' लाय्पोसक्शन ने काढून टाकणे, तसेच शरीराच्या कुठल्याही भागावरील अतिरिक्त चरबी  कायमची काढण्यासाठी लाय्पोसक्शन हि शस्त्रक्रिया वरदानच ठरते

वार्धक्याच्या खुणा पुसून टाकण्यासाठी फेस लिफ्ट, फोरहेड लिफ्ट, डोळ्याभोवतीचा फुगीरपणा कमी करण्यासाठी ब्लेफेरोप्लास्टी या शस्त्रक्रिया वापरल्या जातात. चेहऱ्यावरील छोट्या सुरकुत्या, कपाळावरील, भुवया जवळील आठ्या 'बोटोक्स' इंजेक्शनने चुटकीसरशी घालवता येतात.

कॉस्मेटिक सर्जरीने फक्त माणसाचं दिसण सुधारत अस नाही तर त्या व्यंगामुळे आलेला न्यूनगंड जाऊन ती व्यक्ती अंतर्बाह्य 'सुंदर' होते, नवीन आत्मविश्वासाने आपली ध्येये साध्य करायला पुढे सरसावते.

No comments:

Post a Comment