असोसिअशन ऑफ कॉस्मेटिक लेसर सर्जन्स या भारतातील लेसर असोसिअशन तर्फे दिल्ली येथे प्लास्टिक सर्जन्स, त्वचारोग तज्ञ व लेसर यांच्याकरिता कॉस्मेटिक लेसर अपडेट २०११ हि एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये जगभरातील अद्यावत लेसर उपचार, कॉस्मेटिक सर्जरी मधील नव नवीन उपचार पद्धती तसेच निरनिराळी लेसर मशिन्स बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
या मध्ये कोल्हापूरच्या लक्ष्यकिरण लेसर सेंटर चे संचालक व प्रसिद्ध प्लास्टिक, कॉस्मेटिक व लेसर सर्जन तसेच असोसिअशन ऑफ कॉस्मेटिक लेसर सर्जन्स चे मानद सचिव डॉ. उद्धव पाटील यांनी लेसर फिजिक्स व लेसर मशीन्स ची कार्यप्रणाली या बद्दल मार्गदर्शन केले. लेसर मशीन्स ची कार्यपद्धती समजून घेण्यापूर्वी प्रकाशाचे पदार्थ विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे, असे नमूद करताना स्लाईडस् च्या माध्यमातून त्यांनी परिणामकारक रित्या समजावून सांगितले.
या परिषदेस देशातील १०० हून अधिक प्लास्टिक, लेसर सर्जन्स उपस्थित होते
No comments:
Post a Comment